महापौर रितू तावडे यांनी घेतली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट
मुंबई, दि. ३० : सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट' च्या वतीने मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर मा. रितू तावडे यांच्याकडे महापौर निधीसाठी मदतीचा धनादेश (चेक) सुपूर्द करण्यात आला.
नुकतीच महापौर रितू तावडे यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात गरजूंना मदत व्हावी, या उदात्त हेतूने महापौर निधीसाठी छोटीशी मदत म्हणून धनादेश महापौरांकडे सोपवण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी केशव परब, अमित पवार, प्रशांत पवार, हेमंत मकवाना, गणेश शिरसागर, रवींद्र जाधव, उपस्थित होते. या भेटीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी विश्वास दिला की, "भविष्यात सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शक्य ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल." संस्थेचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांनी महापौरांचे आभार मानले असून, ही मदत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

0 टिप्पण्या