मुंबई, दादासाहेब येंधे : गिरणगावातील १०७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळा'च्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जोपासत, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात केईएम हॉस्पिटल रक्तपेढी, नायर हॉस्पिटल, जे जे महानगर, वाडिया हॉस्पिटल या सर्व रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. या शिबिरात एकूण ८८० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले.
रक्तदान शिबिराचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष राजन डीचोलकर व मानद सचिव संतोष सोहनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता आरोग्य केंद्र प्रमुख किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेत सदर शिबीर उत्साहात पार पडले.


0 टिप्पण्या