मुंबई, दादासाहेब येंधे : पायधुनी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान मस्जिद बंदर परिसरातून ८.७१६ किलो गांजा जप्त करून दोन महिलांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ₹३,२९,३३० असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने ३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता मस्जिद बंदर येथील नंदलाल जानी रोडवरील गोमुख हॉटेलसमोरील झोपडी क्रमांक ३९ येथे छापा टाकला.
सदर कारवाईदरम्यान दोन्ही महिलांच्या ताब्यातून ८ किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत जप्तीची प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल नियमानुसार सीलबंद करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे बेबी बॉक्स शेख (वय, ५७) आणि हसनैन शेख (वय, २५) अशी असून, दोघीही मस्जिद बंदर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा (एनडीपीएस ऍक्ट) अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त (झोन-२) आर. रागासुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आणि पोलीस निरीक्षक अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
![]()

0 टिप्पण्या