Ticker

6/recent/ticker-posts

TVJA गोविंदाचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन

मुंबई, दि.२८ : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये मानवी मनोरा उभारत उत्साह, साहस आणि संस्थेच्या एकतेचे दर्शन घडविले.


दहीहंडी हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक आणि साहसी खेळ. काळानुरूप या खेळाचे स्वरूप बदलत असताना प्रो-गोविंदा स्पर्धांमुळे या क्रीडाप्रकाराला व्यापक व्यासपीठ मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर TVJAच्या सदस्यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभागी न होता केवळ आनंद, मैत्री आणि आपुलकी जपण्यासाठी गोविंदा पथकाची उभारणी केली होती.

मानवी थर उभारण्यासाठी सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून सराव व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वरळीतील NSCI डोम येथे दहीहंडी उत्सवात सहभागी होत मानवी मनोरा उभारला. यावेळी उपस्थितांनी गोविंदांच्या साहसी खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला.

दैनंदिन बातम्यांचे कव्हरेज आणि धावपळीच्या पत्रकारितेतून काही काळ बाजूला होत TVJA च्या सदस्यांनी आपल्या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला. या उपक्रमातून सदस्यांमधील मैत्री, आपुलकी आणि संघभावना अधिक दृढ झाली.

थरांच्या उंचीपेक्षा TVJAच्या एकतेची उंची मोठी’ हा संदेश देत पार पडलेल्या या उपक्रमाने दहीहंडी उत्सवाला एक वेगळेच सामाजिक आणि संघटनात्मक रूप दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या