Ticker

6/recent/ticker-posts

आग्रीपाड्यात सराईत गुंड गजाआड

मुंबई, दि. ५ : आग्रीपाडा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यात अरबाज अली मोहसीन अली या आरोपीला अटक केली आहे. अरबाज हा सराईत गुन्हेगार असून २०२५ वर्षात पाचवेळा तुरुंगात जाऊन आला आहे. वारंवार अटक आणि तुरुंगवारी करूनही गुन्हे करण्याची सवय काही जात नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी याच परिसरातील रहिवाशी सुरेश जयस्वालयांच्या तक्रारीवरून  घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या ओंकार टॉवरमधील घरात शिरून सुमारे तीन लाखांची रोख रक्कम आणि २२ लाखांचे दागिने चोरीला गेल्याची त्यांची तक्रार होती. आग्रीपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून अरबाज अली याला शोधून काढले. 

त्याने चोरीचे दागिने एका सोनाराला विकल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी सोनाराकडून चोरीचे दागिने जप्त केले. चौकशीमध्ये अरबाज यांच्यावर ३३ गुन्हे दाखल असून त्याला फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुंबईतून हद्दपार करण्यात आल्याचे समोर आले. वर्षभरात त्याला दादर, वडाळा टी टी, आग्रीपाडा, भायखळा, आग्रीपाडा पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. पण,  जामिनावर बाहेर आल्यावर प्रत्येकवेळी तो पुन्हा गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या