मुंबई, दादासाहेब येंधे : अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखोराला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आरोपीविषयी माहिती दिली आहे. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकवा देत होता.

आरोपीचं खरं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम आहे. तो विजय दास असं नाव बदलून राहत होता. आरोपी विजय दास याआधी ठाण्यातील हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करत होता. याबाबतची माहिती मिळताच काही जणांनी त्याला पकडून ठेवलं होतं. मुंबई क्राईम ब्रांचला याबाबत माहिती मिळताच टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांना मध्यरात्री बाराच्या सुमारास हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर झोन-६ चे डीसीपी नवनाथ ढवळे यांना आरोपी हाताबाहेर जाऊ नये म्हणून माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांचे पथक तात्काळ पोलीस ठाण्यात रवाना झाले आणि गुन्हे शाखेचे पथकही तेथे पोहोचले. आरोपी जंगलाच्या आतील झुडपात लपून बसल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत टॉर्च आणि मोबाईल टॉर्चच्या मदतीने त्याला शोधलं. जंगलात पोलीसांना कळू नये म्हणून त्याने झाडाची पाने गुंडाळली होती.
पोलिसांनी आरोपीला चारही बाजूंनी घेरलं. त्यामुळे त्याला पळून जाता आलं नाही. अटकेनंतर आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा