साडेसहाशे ई-बाईक पोलिसांकडून जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १ जानेवारी, २०२५

demo-image

साडेसहाशे ई-बाईक पोलिसांकडून जप्त

मुंबईत वाहतूक पोलिसांची उत्कृष्ट कारवाई


मुंबई, (दादासाहेब येंधे) : ई-बाईक चालकांकडून नियम मोडण्याचे प्रमाण खूप वाढल्याबद्दल नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत तब्बल ६७२ ई-बाईक जप्त केल्या आहेत. नियम मोडणाऱ्या चालकांवर भारतीय न्याय संहिता अन्वये १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


traffic%20police

मुंबई वाहतूक पोलिसांकडे याबाबत नागरिकांच्या वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी येत होत्या. ई-बाईकचे चालक वाहतूक नियमांचा भंग करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत होते. बेशिस्त ई-बाईक चालकांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून पोलीस सहायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी १८ ते २९ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती.


पोलिसांनी या विशेष मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८१ ई-बाईक चालकांवर गुन्हे दाखल करत ६७३ ई-बाईक जप्त केल्या. ई-बाईक चालकांप्रमाणे डिलिव्हरी बॉयकडूनही नियम मोडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यांच्याकडून लवकरात लवकर वस्तू पोहोचवण्याच्या नादात नियम पायदळी तुडवणाऱ्या १८० डिलिव्हरी बॉयच्या वाहनांवर ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारण्यात आलेला आहे.


%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95%20%20181Press%20Note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *