ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची उत्कृष्ट कारवाई - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची उत्कृष्ट कारवाई

पोलिसांनी तस्करांकडून ५५३ किलो गांजा केला जप्त


ठाणे, दादासाहेब येंधे : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका आणि नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणवाराला कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी मिशन ऑलआऊटच्या अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५५३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी दोन कोटी ८६ लाख ६१ हजार ६८० रुपयाचा ५५३ किलो वजनाचा गांजा अमली पदार्थ जप्त करून ०९ जणांना अटक केली आहे.


गांजा तस्करी करणाऱ्या साखळीच्या नऊ आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा कक्ष-२ भिवंडी चे पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई रांजोली नाका हायवे लगत असलेला मुंबई-नाशिक महामार्गाच्या डाव्या बाजूच्या पाईपलाईन रोडला येथे आरोपी पती राम पंगी उर्फ सुरज (३८ वर्ष, रा.जि. कोरापुर, ओरिसा) ,अर्जुन लचना शेट्टी,(२० वर्ष, रा.जि. कोरापुर, ओरिसा,अमीन बाबु सैय्यद, (३९ वर्ष, रा.ता. लोहा, जि. नांदेड ) या तीन आरोपींनी ओरिसा येथून भिवंडी येथे टेम्पोमध्ये तब्बल ५५३ किलो गांजा अंमली पदार्थ वाहतूक प्रकरणे अटक केले आहे.सलीम गुलामनबी शेख,(३० वर्ष, रा. कली डॉक्टर यांची गल्ली, गल्ली नंबर१, संभाजीनगर,) इमरान हाजी अहमद शेख, (३६ वर्ष, रा. आयडीयल कॉलेजच्या समोर, झोपडपट्टी, भिवंडी) रमजान वकील अहमद अन्सारी, (२५ वर्ष, रा. पावर हाऊस, भिवंडी) यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर ह्या तीन आरोपींनी तो गांजा टेम्पो स्वतः ओरिसा ते भिवंडी येथे आलेला टेम्पो ताब्यात घेतला आहे. नाजीम हाफीज फराद अन्सारी, (४७ वर्ष, रा. भोईवाडा, भिवंडी) अमीत उर्फ किरण रंगराव सोनोने,( ३५ वर्ष, रा. बापगांव, ता. कल्याण,) मार्कस मार्टीन म्हस्के, (३६ वर्ष रा.भिमनगर, विठ्ठलवाडी, उल्हासनगर नंबर-४) यांनी आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी विक्री करीत आणलेल्या गांजा हा अंमली पदार्थ खरेदी करून तो विक्री करीता घेवुन जात असताना मिळून आले आहे. पहिल्या सहा आरोपींनी हा टेम्पो ओरिसा ते भिवंडी वाहतूक करून सात ते नऊ क्रमांकाच्या आरोपींना विक्री केले आहे तसेच आरोपींनी या टेम्पोचा बनावट नंबर तयार करून तो गांजा ने भरलेला टेम्पो विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी या नऊ आरोपींना अटक केली असून या आरोपींच्या विरुद्ध एनडीपीएस ॲक्ट कलम ८ (क),२० (ब) ii(क),२९ सह भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३३९, ३४० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-२ करत आहे. तसेच आरोपींनी साखळी पद्धतीने गांजा अंमली पदार्थ विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची उत्कृष्ट कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे ठाणे, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक निसार तडवी, पोलीस हवालदार अमोल देसाई, प्रकाश पाटील, सुनिल साळुंखे, शशिकांत यादव, सचिन साळवी, रंगनाथ पाटील, साबिर शेख, वामन भोईर, मंगेश शिर्के, सचिन जाधव, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, उमेश ठाकुर, नितीन बैसाणे, रविंद्र साळुंखे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज