जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे वह्यावाटप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १४ जून, २०२४

demo-image

जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे वह्यावाटप

मुंबई, दादासाहेब येंधे : अथक मेहनत व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर एखाद्या ध्येयाचा पाठलाग करत त्यामध्ये उत्तम यश प्राप्त करणे. तसेच मिळालेल्या यशाचे कोणीतरी स्तुती किंवा कौतुक करणे म्हणजे सर्वानाच सुखाहून जाते, त्यातून एक नवा हुरूप येतो. म्हणूच दरवर्षी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने रंगारी बदक चाळ संकुलातील दहावी व बारावी शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येते. 

%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F

यंदाही शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये उत्तीर्ण विध्यार्थ्यांना प्रशतीपत्र व शालोपयोगी वस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 


सदर कार्यक्रम श्रीकृपा इमारतीच्या कार्यालयात दिनांक १३ जून रोजी संपन्न झाला दरम्यान श्रीकृपा सोसायटीचे अध्यक्ष - संतोष सकपाळ, सरचिटणीस - भाऊसाहेब शिंदे, जीवन प्रबोधिनी  ट्रस्टचे पदाधिकारी गणेश काळे,  मंगेश पिंपरकर, शंकर साळवी, नंदकुमार चिबडे, बाळा खोचरे, संदीप सकपाळ, केशव परब, नागेश तांदळेकर, बाजीराव तुपे, हेमंत मकवाना, प्रशांत पवार, गणेश पार्टे, ओमकार रहिवाशी संघाचे व श्रीकृपा सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *