मुंबई, दादासाहेब येंधे: बस थांब्यांवर वाहने उभी केल्यामुळे विद्यार्थी, अपंग व्यक्ती व वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहरात विशेषमोहिम राबवली. या मोहिमत बस थांब्यांवर उभ्या करण्यात आलेल्या साडेनऊ हजारांहून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी १० लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनचालक त्यांची वाहने बस थांब्यांसमोर उभी (पार्क) करत असल्याने विद्यार्थी, अपंग व्यक्ती व वृद्धांना बसमध्ये चढ-उतार करणे अडचणीचे होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेने अशाबेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी २४ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली. त्यानुसार
५ मेपर्यंत या कारवाईत बस थांब्यांवर उभ्या करण्यात आली. नऊ हजार ६६५ वाहनांना दंड करण्यात आला. त्यांच्याविरोधात ई-चलानद्वारे दंड ठोठावण्यात आला आहे. त्याद्वारे १० लाख २१ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमानुसार, बेस्ट थांब्याच्या १५ मीटरच्या आत वाहने उभी करण्यास मनाई आहे. पण, काही चालक बस थांब्यांवर वाहने उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. जेजे पुलाखालील बेस्ट बसचा थांबा पूर्णपणे फेरीवाल्यांनी किंवा बेंकायदा वाहनांनी व्यापला आहे. दादर, मुंबई सेंट्रल, अँटॉप हिल, घाटकोपर, मालाड मालवणी, गोरेगाव आदी ठिकाणी बस स्थानकांवर अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगची समस्या सर्वाधिक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा