मुंबई, दि. ३१ : वाकोला पोलिसांच्या हद्दीत शस्त्राचा धाक दाखवत माजी कामगार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सोनाराला जवळपास दीड कोटी रुपयांना फसवले. त्यांनी २ किलोहून अधिक सोने चांदी पळवून नेली. या प्रकरणी परिमंडळ-८ चे पोलीस उपयुक्त दिक्षित गेडाम यांच्या पथकाने पालघरच्या सफाळे मधून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
चोरीला गेलेल्या मुद्देमालासह देशी बनावटीचा कट्टाही हस्तगत करण्यात आला आहे. बालू सिंग परमार, महिपाल सिंग लेरूलाल उर्फ लकी भिल, मांगीलाल भिल आणि कैलास भिल अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे मूळचे राजस्थानचे राहणारे आहेत. वाकोला परिसरात १९ जानेवारी रोजी नरेश सोळंकी आणि त्यांची पत्नी घरात असताना बालूसिंग यांनी जवळपास १ कोटी ४३ लाख १४ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने पळून नेले होते.
वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील केगार, रितेश माळी, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम, निर्मल नगरचे फुंदे यांची पथके तयार करून ती तपासासाठी रवाना करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा