मुंबई, दि. ९ : हिरे व्यापाराच्या घरातून सुमारे सहा लाखांची रोकड चोरी करून पळून गेलेल्या आरोपीला २४ तासांत चोरीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. राजू बेंडू नाचरे असे या नोकराचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी गावदेवी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
तक्रारदार हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबासोबत गावदेवी परिसरात राहतात. त्यांच्याकडे राजू नाचरे हा घरगडी म्हणून काम करत होता. ८ डिसेंबरला राजू हा कपाटातील सुमारे सहा लाखांचे रोकड चोरी करून पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येतात त्यांनी गावदेवी पोलिसांत राजू विरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात पळून गेलेल्या राजूला पोलिसांनी अटक केली. चोरीनंतर तो झवेरी बाजार शेख मेमन स्ट्रीटवर गेला होता. तेथूनच त्याला ताब्यात घेण्यात आले.

0 टिप्पण्या