Ticker

6/recent/ticker-posts

सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

 हॉटेल मॅनेजरला अटक


मुंबई, दि. ८ : अंधेरीतील सिल्वर क्लाउड हॉटेलच्या मॅनेजरच्या मदतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मरोळ मोराशी रोड परिसरातील या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार कक्ष-१० च्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला असता एक अल्प मुलगी तेथे मिळून आली. तिथून एका महिलेसह एका पुरुषाला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. तेथे हॉटेल मॅनेजरच्या मदतीने अल्पवयीन मुलींचे सेक्स रॅकेट सुरू होते. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.


2308

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या