मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच मुंबईतील शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर न केल्याने सुट्टीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. बहुतेक शाळांनी पालकांना संदेश पाठवून ६ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली. काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. परंतु सुट्टीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
0 टिप्पण्या