Ticker

6/recent/ticker-posts

चार ड्रग्ज माफियांकडून १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई, दि. ५ : मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षा-३ ने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत चार जणांकडून बारा लाख किमतीचा ६० ग्रॅम अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे.




अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने गावदेवी, अंधेरी, डोंगरी या परिसरात दोघा ड्रग्ज तस्करांना रंगेहात पकडले. त्यांच्या चौकशीत त्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडून एमडी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या तिसऱ्या ड्रग्स पेडलरला देखील अटक केली. या तिघांकडून पथकाने ३० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉनचा साठा हस्तगत केला. दरम्यान, कांदिवली युनिटने मिळवलेल्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी येथे छापा टाकून एका पेडलरला पकडले. त्याच्याकडे पोलिसांना ३० ग्रॅम मेफेड्रॉन सापडले. अशाप्रकारे Templates चौघा ड्रग्ज माफीयांना बेड्या ठोकून १२ लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला.



फोटो: police twitter handle

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या