मुंबई, दि. ३ : युनानी डॉक्टर असल्याचे भासून फसवणूक करणाऱ्या राजस्थानच्या टोळीला नव्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी नऊ तक्रारदार समोर आले असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. माटुंगा येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा संधिवाताच्या उपचाराच्या नावाखाली आरोपींनी साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली होती.
रक्त काढून व्रणावर ब्लेडने मार्किंग
या प्रकरणातील बहुसंख्या तक्रारदारांच्या शरीरातून पित्त काढण्याच्या नावाखाली अंगावर जखमा करून त्यातून छिद्र असलेल्या मेटल क्यूबने (तुंबडी) लावली. त्यावेळी आरोपीने महिला तक्रारदाराचे रक्त साठून झालेल्या व्रणावर ब्लेडने मार्किंग करून तक्रारदार यांच्या पत्नीच्या गुडघ्यातील पस/पू बाहेर काढल्याचे त्यांना भासवून त्यांच्याकडून ०७ लाख ५०,०००/- घेऊन तेथून पळ काढला.
युनानी डॉक्टर असल्याचे भासवून ही टोळी उपचाराच्या नावाने फसवणूक करत होती. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ ने या टोळीचा हा प्रयत्न हणून पाडत त्यांना अटक केली आहे. आरोपींची व्हाट्सअप वरील संभाषणे व दूरध्वनीच्या माहितीवरून आणखी एका तक्रारदाराची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. अटक आरोपींपैकी मोहम्मद शेरू हाच सर्व तक्रारदारांच्या घरी डॉक्टर पटेल बनून गेला होता. जवळजवळ एक कोटी रुपयांना लोकांना या टोळीने फसवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत तपास सुरू आहे.
२२८७
0 टिप्पण्या