Ticker

6/recent/ticker-posts

हेल्पलाइनमुळे वाचले ८९ लाख

मुंबई, दि. २: सायबर हेल्पलाइनमुळे मुंबईतील नागरिकांचे २४ तासात ७९ लाख ३७ हजार ११६ रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर फसवणुकीची शिकार ठरलेल्या नागरिकांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.


गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेली रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये गोठवण्याकरिता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत १९३० हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायबर फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या तक्रारदारांनी फसवणूक झाल्यानंतर १९३० हेल्पलाइनला फोन केला होता.


हेल्पलाइन मध्ये काम करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी माहिती घेऊन तात्काळ संबंधित बँकेशी पाठपुरावा करत रक्कम गोठविण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील तक्रारदार यांचे ३२ लाख १६ हजार ७८६, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील एकूण पाच तक्रारदारांसह ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील तक्रारदार यांचे दीड लाख रुपये असे एकूण ७९ लाख ३७ हजार ११६ रुपये गोठविण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. नागरिकांनी सायबर फसवणुकीची शिकार झाल्यास तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या