मुंबई, दि. १ : परळ येथील के.ई.एम रुग्णालय परिसरातील पाणपोई तातडीने सुरु करा अशी मागणी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांनी के.ई.एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगिता रावत यांची भेट घेऊन केली. यावेळी सोबत संस्थेचे पदाधिकारी प्रशांत पवार हे देखील उपस्थित होते.
परळ येथे असलेलं के.ई.एम रुग्णालय हे मुंबई महापालिकेचे अग्रगण्य आरोग्य सुविधा देणारे रुग्णालय आहे. या रुग्णालयात महाराष्ट्र नव्हे तर देशातील इतर राज्यातून सुद्धा उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. रुग्णालय परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एक पाणपोई असून सदर पाणपोई अनेक दिवसांपासून बंद आहे. सदर पाणपोई रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तहान भागवण्यासाठी उपयोगी पडायची. मात्र, ती आता बंदावस्थेत असल्यामुळे सदर पाणपोई पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्या अनुषंगाने सदर भेट घेतल्याचे श्री. नर यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त व उप आयुक्त सार्वजनिक आरोग्य यांना देखील सादर करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या