Ticker

6/recent/ticker-posts

पवईत खंडणीसाठी तरुणाचे अपहरण

पोलिसांनी अपहरण करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या


मुंबई, दि. ३० : घातक शास्त्रांसह खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून त्याला मारून पळून गेलेल्या मोहम्मद शकील उर्फ जमिल चौधरी, आमीर जावेद शेख या दोन सराईत गुन्हेगारांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


हे दोघेही पवईतील मिलिंदनगर येथील रहिवाशी आहेत.  जिषान खालिद हा अंधेरी येथे राहत असून तो पवई मधील एका खाजगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. तो एअरटेल सेंटर मध्ये सर्व्हर मेंटेनन्ससाठी गेला होता. तो पहाटे चार वाजता चांदीवली जंक्शन, पेट्रोल पंपाजवळ बसची वाट पहात असताना दोघेजण तिथे बाईकवरून आले व त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. व त्याला जबरदस्तीने बाईकवर बसवून सहार एअरपोर्ट येथील पार्किंग मध्ये नेऊन त्याच्या हातावर वार केले.  व त्याच्या मोबाईलवरून त्याच्या खात्यातील २,०५०/- रुपये त्या दोघांजवळ असलेल्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतले. जिषान याने पोलीस ठाणेत तक्रार दाखल केल्याने परिमंडळ -१० ने तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करून गुन्हा उघडकीस आणला व दोघांना तात्काळ बेड्या ठोकल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या