Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीत बालकदिनाचे आयोजन

मुंबई, दि. ३० : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ येथे आज बालक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


काळाचौकी परिसरात प्रसिद्ध असलेले नवबालक क्रीडा मंडळातर्फे आज रंगारी बदक चाळीच्या प्रांगणात बालकदिन साजरा करण्यात येणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग बॉल, ट्रेन, झोपाळा, फ्लाईंग बोट अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुरत्न नवबालक पुसरकार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


मंडळाचे प्रमुख विश्वस्त अनिल हेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बालकदिन मोठया दिमाखात पार पडणार आहे. तरी सर्व बालगोपाळांनी या आनंदाच्या क्षणी उपस्थित राहून मजा लुटावी असे आवाहन अनिल हेलेकर यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या