मुंबई, दि. २९ : मानखुर्द येथील एकता नगर मध्ये दोन ते तीन दहशतवादी आले होते. त्यांची भाषा मला समजली नाही. त्यांचे काहीतरी कटकारस्थान चालले आहे. असा पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती देणाऱ्या तरुणाला मानखुर्द पोलिसांनी नुकतेच शोधून काढले आहे. त्या तरुणांनी अशा प्रकारचा खोटा फोन केला असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
एकता नगर परिसरात दोन ते तीन लोक संशयास्पद फिरताना दिसत आहेत. त्यांच्याकडे बॅगा असून त्यांनी माझ्याकडे बाथरूमला जाण्याचा पत्ता विचारला. पण, त्यांची भाषा मला समजली नाही, असा कॉल करून पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला त्याने कळवले. यानंतर मानखुर्द, शिवाजीनगर आणि ट्रॉम्बे पोलिसांच्या पथकांनी एकता नगर परिसरात संशयित व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणारा किशोर ननावरे हा पोलिसांच्या तावडीत सापडला. चौकशीत किशोरने खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे..

Press note
0 टिप्पण्या