मुंबई, दि. २७ : ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान खार आणि सांताक्रूझ परिसरातून वांद्रे युनिटच्या अँण्टी नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱयांना हुसैन मोहम्मद युसूफ शेख आणि मोहम्मद जाफर मोहम्मद मंजूर शेख या दोन आरोपींना अटक करुन ४० लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत केला आहे.
यावर्षी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज तस्करीचे ९६ गुन्हे दाखल केले असून १९९ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी ४८ कोटीचा ड्रग्जचा साठा हस्तगत केला आहे.
याच गुन्ह्यात दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ऑल आऊट मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच काहीजण खार आणि सांताक्रूझ परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून हुसैन शेख आणि मोहम्मद जाफर शेख या दोघांना अटक केली. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोनशे ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि दोन मोबाईल सापडले. त्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. यातील मोहम्मद जाफर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असूननत्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
2278
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा