Ticker

तक्रार दिनाचे आयोजन

मुंबई, दि. ११ :  मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई व मा. विशेष पोलीस आयुक्‍त, बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये व मा. पोलीस सह आयुक्‍त (का. व सु.), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. आज दिनांक ०९/०९/२०२३ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक यांच्याकरीता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.


सदर आयोजित तक्रार निवारण दिनाच्यावेळी पोलीस ठाण्यात दाखल दखलपात्र व अदखलपात्र गुन्हयातील फिर्यादी तसेच तक्रार अर्जामधील अर्जदार असे एकुण १०५० तक्रारदार हजर होते. त्यांपैकी ७२१ महिला तक्रारदार व १४३ जेष्ठ नागरीक हजर होते. पोलीस ठाण्याचेव वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्याकडून त्यांच्या तकारीचे निरसन करण्यात आले.


प्रसंगी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्‍त हे हजर होते. तसेच प्रादेशिक विभागांचे अपरपो लीस आयुक्‍त व परिमंडळीय पोलीस उप आयुकत यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या