आला..आला, लाडका लंबोदर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

demo-image

आला..आला, लाडका लंबोदर

१०/९/२०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सव जसजसा जवळ जवळ येऊ लागला आहे तशा गणरायाच्या मोठमोठ्या मुर्त्या मंडपाकडे रवाना होताना दिसून येत आहे. काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या लाडक्या लंबोदराची देखील मूर्ती रविवारी मोठ्या उत्साहात मंडपाकडे आणण्यात आली. प्रसंगी मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, सदस्य, स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते. 

IMG20230910202727

यावेळी येथील अबाल वृद्धांनी बाप्पाचे मनोभावे स्वागत केले. लहान मुलींनी स्वागत गीतावर सुंदर डान्स करून बापाचे स्वागत केले. तर महिलांनी लेझीम खेळून बाप्पाचे स्वागत केले. येथील तन्वी येंधे हिने महिला जनजागृतीपर लाठी-काठी फिरवून बाप्पाचे स्वागत केले. एकूणच हा सोहळा पाहण्याजोगा ठरला. 

टाळ मृदुंगाच्या भक्तीत स्वागत गीत

लेझीम


लाठी-काठी प्रात्यक्षिक

1 टिप्पणी:

  1. blank

    नमस्कार
    खूप छान आगमन झालं. सर्व रहिवाशांचे डोळ्याचे पारणें फिटले. पारंपरिक लेझीम नृत्य, लहान मुलींनी सादर केलेला टाळ मृदूंगावर केलेले नृत्य, लाठी काठीची केलेली बहारदार करामत.दृष्ट लागेल असं श्रेय रहिवाशांच्या मुलांनी केल..त्याबद्दल मी प्रविण पावसकर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशीच तुमची भक्ती आपल्या लाडक्या लंबोदरावर राहुदेत हिच इच्छा लंबोदरच्या चरणी प्रकट करतो 🙏

    उत्तर द्याहटवा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *