CSMT रेल्वे स्टेशन पोलीस मित्र ( साफसफाई कर्मचारी ) सदस्यांची बैठक घेऊन EYES & EARS संकल्पनेबाबत माहिती - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, ४ मार्च, २०२३

demo-image

CSMT रेल्वे स्टेशन पोलीस मित्र ( साफसफाई कर्मचारी ) सदस्यांची बैठक घेऊन EYES & EARS संकल्पनेबाबत माहिती

होळी/ धुलीवंदन/ तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती / गुढीपाडवा या सणांच्या अनुषंगाने सतर्कतेबाबत जनजागृती


मुंबई, दि. ४ :  दिनांक ०३/०३/२०२३ रोजी दुपारी १४.१५ ते १४.४५ वाजेपर्यंत CSMT रेल्वे स्टेशन फलाट क्र.७ वरील मिलन हॉल परिसर येथे पोलीस मित्र ( साफसफाई कर्मचारी ) सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

IMG-20230303-WA0049

सदर वेळी उपस्थित सदस्यांना  माननीय यांच्या EYES & EARS या संकल्पने बाबत पुन्हा माहिती देऊन, त्यांनी रेल्वे परिसरात पोलिसांचे डोळे व कान म्हणून काम करण्याबाबत सांगण्यात आले. 

            

आगामी होळी/ धुलीवंदन/ छत्रपती शिवाजी महाराज जयंती/ गुढीपाडवा या सणांच्या वेळी काही देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटना देशात व राज्यात कोणतेही घातपाती कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्याकरिता  रेल्वे स्थानक व रेल्वे गाड्या यांना लक्ष बनविले जाण्याची दाट शक्यता आहे.

          

IMG-20230303-WA0045

त्या अनुषंगाने स्थानक परिसरात, रेल्वे प्रवासात लोकलमध्ये अथवा प्लॅटफॉर्मवर कोणतीही बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संशयास्पद हालचाली किंवा इसम दिसून आल्यास अथवा संशयास्पद संभाषण ऐकल्यास त्याबाबत तात्काळ ड्युटीवरील पोलीस अधिकारी /अंमलदार, आर.पी.एफ. कर्मचारी किंवा रेल्वे कर्मचारी यांना सदर बाबत माहिती द्यावी. अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाइन नंबर १५१२, आरपीएफ हेल्पलाइन नंबर १३९ या नंबर वर तात्काळ संपर्क करणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.

              

IMG-20230303-WA0047


सदर बैठकीस गोपनीय शाखेचे अंमलदार व CSMT रेल्वे स्थानकातील ४० साफसफाई महिला पुरुष  उपस्थित होते.सदर बैठकीत उपस्थित सुपरवा्यझर यांना जे साफ सफाई कर्मचारी उपस्थित नसतील तर त्यांना देखील सदर बाबत अवगत करावे असे सांगण्यात येऊन उपस्थितांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनी दिली आहे. 

                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *