गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

demo-image

गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीस बी.के.सी. पोलीस ठाणे कडुन अटक


मुंबई, दादासाहेब येंधे : दिनांक १२/०२/२०२३ रोजी रात्री १९.७४ वा. ते २०:१५ वा. चे दरम्यान मोबाईल कमांक धारक व्यक्तीने गुगल इंडीया प्रा.लि. एफ.आय.एफ.सी. इमारत, जी ब्लॉक, बिकेसी, बांद्रा पुर्व, मुंबई येथील कार्यालयात संपर्क करून पुणे येथील गुगल इंडीया प्रा.लि. या कार्यालयात दहशत निर्माण करण्याच्या हेतुने बॉम्ब ठेवले असल्याबाबत वक्तव्य केले म्हणुन बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई येथे ६३/२०२३, कलम ५०५ (१)(ब), ५०६ (२) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर धमकीचा फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर पथक तयार करण्यात आले व धमकीचा फोन करणारा इसम वय ४८ वर्षे यास चांदनगर, हैद्राबाद, तेलंगणा या परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील तपास सुरू आहे.


सदरची कामगिरी श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुकत, बृहन्मुंबई, श्री. देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. सत्य नारायण, पोलीस सह आयुक्त, (का.व सु.), बृहन्मुंबई, श्री. परमजितसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बांद्रा प., मुंबई, श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०८, मुंबई, श्री. कैलास आव्हाड, स.पो.आ., खेरवाडी विभाग, मुंबई, श्री. विश्राम अभ्यंकर, व.पो.नि., बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई, श्री. राजेश गवळी, पो.नि.(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अभिजीत थोरात, पो.उ.नि. विशाल पालांडे, स.पो.नि. पवनकुमार भोये, पो.उ.नि. राहुल चंदनशिव, पो.ह.क. ०१३१२/नितीन घोरपडे, पो.ह.क. ०३१६१३/नेताजी गायकवाड, पो.शि.क. १३०५७७/संतोष लोणे यांनी केली आहे.


1822_page-0001


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *