नको मला बंगला-गाडी शोधेन मी व्यसनमुक्त गडी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

demo-image

नको मला बंगला-गाडी शोधेन मी व्यसनमुक्त गडी

मुंबई, दि. १४ : नरिमन पॉईंट येथे जोडीदार मज निर्व्यसनीच हवा या संदेशाचे घोड्यावर स्वार। होऊन महाराष्ट्राच्या लेकींनी वरात काढून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. नको मला बंगला-गाडी शोधणे मी व्यसनमुक्त गडी अशा प्रकारचे संदेश देत नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे प्रचार करण्यात आला. यात मुंबईतील व्यसनमुक्तीपर कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.

NASHA%20MUKTI%20VALENTINE%20DAY%20CELEBRATION%20001


व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रूच. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे थोड्या वेळाची करमणूक असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रेम. मनाचा व शरीराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम. हेच बंध आणि अडचणी दुःखात आधार ठरतात. व्यसने आधारापोटी कवटाळली जातात. परंतु, व्यसने ही आधार नाहीत हे प्रत्येकाने समजावून घेतले पाहिजे.


जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्याच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार आपणास ढसाळताना दिसतो. व्यसनाधीतेकडे वाढत चाललेलली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यतर्फे करण्यात आले होते. वरील संदेश एकाच वेळी देण्याच्या उद्देशाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 'प्रेम करा मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा' हा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरून देत असल्याची माहिती देत हा व्यसनमुक्तीचा लढा यापुढे अखंडपणे चालू राहील असे सांगत व्यसनमुक्त जीवनच सुख समृद्ध बनवू शकते. म्हणून निर्व्यसनी आयुष्याची कास धरली पाहिजे असे मत मंडळाच्या सचिटणीसांनी यावेळी व्यक्त केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *