सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १२ तासात तांत्रिक तपास करून शिताफिने अटक
दि.१४/०९/२०२२
मुंबई, दादासाहेब येंधे : तक्रारदार श्रीराम कश्यप श्रीनिवास मुलकुटला हे दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ रोजी सव्वा चार वाजता दादर रेल्वे स्टेशन फलाट क्र.०१ वर डोंबिवली स्लो लोकलच्या मोटरमन बाजुकडील जनरल डब्यात गर्दित चढत असताना त्यांची पत्नी अनुषा मुलकुटला यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र पाठीमागुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने जबरीने खेचुन चोरून नेले होते. परंतु त्यांना कंपनीचे महत्वाचे ऑनलाईन काम असल्याने त्यांनी दिनांक ०९/०९/२०२२ रोजी दादर लोहमार्ग पोलीस ठाणेत जाऊन मंगळसुत्र जबरीने खेचुन चोरी केल्याबाबत तक्रार दिली होती. ज्याची किंमत २,२५,०००/- रूपये होती.
नमुद गुन्हयाचे तपासात मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. ढाकणे यांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. आवारे, पोलीस उपनिरीक्षक आढारी, पोहवा/१०७९ शिंदे, पोहवा/३१८० गावकर, पोना/२८७७ टिंगरे, पोना/१६०८ खैरनार, पोना/५३८ शेंडे, पोशि/१०५६ राठोड, पोशि/११२७ तांबोळी, पोशि/२३०६ परदेशी या टिमने गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासता सदर गुन्हा घडले ठिकाणचे दादर रेल्वे पोलीस ठाणेतील रेकाँर्डवरिल आरोपी शेखर शिंदे सावा असा दाट संशय आल्याने नमुद स्टाफने बुद्धीकौशल्याने आरोपीचे रहाते ठिकाणाबाबत माहिती घेता तो चेंबुर परिसरात रहात असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने स्टाफने तात्काळ चेंबुर परिसरातील आरोपीचे रहाते ठिकाणाबाबत माहिती मिळवुन सदर ठिकाणी जाऊन आरोपी शेखर विजय शिंदे, (वय, ३४), धंदा- सिक्युरिटी, रा. सिध्दार्थ कॉलनी, सर्व्हिस रोड, के.एन.गायकवाड मार्ग, विशाल चायनिस जवळ, चेंबुर, मुंबई. यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केले चौकशीत वरिल नमुद गुन्हा त्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने दादर रेल्वे पोलीस ठाणे, गु.रजि.नं. ८५८/२०२२ कलम ३९२ भादवी या गुन्हयात मा. सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन करून दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली.
सदर आरोपीचे पोलीस कोठडी मुदतीत आरोपीचे घरझडतीतुन गुन्हयातील मुद्देमाल २,२५,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चैन डिझाईनचे एकुण ४६ ग्रँम वजनाचे असे हस्तगत करण्यात आले आहे. नमुद गुन्हा दाखल झाल्यापासुन त्याचा सलग तपास करून १२ तासाचे आत नमुद पथकाने आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. फिर्यादी यांनी दादर रेल्वे पोलीसांचे खुप खुप आभार मानले आहेत.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा