पोलिसांनी वेषांतर करून पकडले
मुंबई, दि. २३ : मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे जवळपास साडेतीन लाखांचे अंगावर घातलेले दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपास अधिकाऱ्यांनी वेषांतर करत दुकलीच्या मुसक्या आवळल्या. ज्यात सराईत हा त्याच्या बुटांच्या जोडमुळे तावडीत सापडला, बोरीवलीतील व्यावसायिक जयंत रसाने (वय, ४७) हे १४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास नॅशनल पार्क याठिकाणी मॉर्निंग वॉकला गेले होते.ते साधारण ६ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास ब्रिजच्या खाली आले. त्यावेळी दुचाकीवरून दोघे त्यांच्या मागून आले आणि त्यांच्या गळ्यातील ४४ ग्रॅमची सोनसाखळी तसेच ५ ग्रॅमचे पॅडल हिसकावून पसार झाले.
याप्रकरणी त्यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक ओम तोटावर यांनी दोन पथके तयार केली. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात पाळत ठेवली. त्यावेळी आरोपी फिरोज नासीर शेख हा गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घेण्यासाठी आल्यावर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा साथीदार जाफर युसुफ जाफरीचाही बुटांवरून ओळखून त्यास अटक केली.

0 टिप्पण्या