सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शीतपेयात एका प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन प्रवासाची लूट केल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी गुंगीचे औषध देणारा आरोपीला सापळा रचून नुकतीच अटक केली आहे मोहम्मद सलीम मोहम्मद एजाज खान असे आरोपीचे नाव आहे.
शब्बीर मेहबूब साहब बाशा शेख हे कुवेत येथे ड्रायव्हरचे काम करीत असून २ जुलै रोजी सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे उतरून चेन्नई एक्सप्रेसने जाण्यासाठी ते सीएसएमटी स्थानकात आले होते. त्यानंतर ट्रेनची वाट पाहत रेल्वेचा जनरल हॉलमध्ये बाकड्यावर ते बसले होते. यादरम्यान आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद एजाज खान याने 'आप किधर से आये हो?' असे विचारले. त्यांनी सांगितले की, "मैं कुवेत से आया हुं"! त्यावेळी खान याने " मैं सौदी से आया हुं" असे त्यांना सांगितले. खान याने त्यांच्याशी ओळख काढून त्यांना बेस्ट आगाराच्या समोरील बागेमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने त्याच्याकडील थंड पाण्याची बॉटल व वेफर त्यांना खाण्यासाठी दिले. शेख याने शीतपेयातील तीन घोट पिले. त्यानंतर तक्रारदार हे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर आले असता तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. ४ जुलै रोजी ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचा लोकेशनच्या आधारे आरोपीची माहिती काढली. १८ ऑगस्ट रोजी सीएसएमटी स्थानकात आरोपी संशयास्पद हालचाल करत असताना सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पिशवीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच एक घडी घातलेली प्लास्टिक पिशवी त्यामध्ये सफेद रंगाची पावडर, शबीर बाशा नाव असलेला पासपोर्ट, एक कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम कार्ड तसेच एक एअरटेल कंपनीचे सिम कार्ड ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे मिळून आलेल्या पासपोर्ट बाबत याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने तो पासपोर्ट त्याचा मित्र शब्बीर शेख याचा असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात खात्री करण्याकरता शब्बीर शेख यांचे नाव पत्ता व मोबाईल क्रमांक याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावरूनन त्या आरोपीवर पोलिसांचा संशय आणखी बळावल्याने त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा साथीदार नामे सल्लू खान याच्यासोबत सीएसएमटी मुख्य मार्गावरील रेल्वे स्थानक येथे बसलेल्या एका इसमास स्थानकाचे बाहेर बस डेपोच्या समोर असलेल्या बागेमध्ये घेऊन जाऊन तेथे गुंगीकारक औषध मिश्रित शीतपेये पिण्यास देऊन परत सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे घेऊन आल्यानंतर त्याला गुंगी येऊन झोप लागली असता त्याची बॅग चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने चोरी केलेली ट्रॉली बॅग, मोबाईल फोन व पासपोर्ट असे हस्तगत करून तक्रारदार प्रवाशाला परत देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मा. श्री कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, मा. श्री देविदास सोनावणे, सहायक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग मुंबई, श्री. मेहबुब इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सचिन मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि श्री सतिश शिरसाठ यांच्यासह पोहवा/१०४० रमेश जाधव, पोना/२४१८ सुरेंद्र कदम, पोना/४०२ श्रीकांत इंगवले, पोना/१४०३ श्रीकांत वळकुंडे, पोशि/३२४७४ अविनाश पाटील, पोशि/९३९ जयवंत वाकडे, पोशि/१४१४ सचिन राठोड, पोशि/१२७३ किरण खेताडे, पोशि/१८४७ तुषार पिसाळ, पोशि/२३९ प्रशांत खरात, पोशि/१७९३ सारंग पाटील सर्व नेमणूक सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांनी बुध्दीकौशल्याचा वापर करुन रेल्वे प्रवाशांना गुंगीचे पदार्थ देवून चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीस जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा