तक्रादार नामे श्री. मंगेश रामचंद्र पुरूषन, (वय,६३)राह सेक्टर १८, नवीन पनवेल यांचे राहते घराचा कोणीतरी अज्ञात इसमाने भरदिवसा दुपारच्या वेळी कडी कोयंडा तोडुन त्यांचे रूममधील ३१ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरी केल्याबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे येथे दि. २७/७/२०२२ रोजी गु र क्र २०५/२०२२ कलम ४५४, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी घटनास्थळाचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी इसम येण्याच्या मार्गावरील तसेच आरोपी इसम यांनी गुन्हा केल्यानंतर ते जाण्याच्या मार्गावरील त्याप्रमाणे पनवेल रेल्वे स्टेशन पासुन सॅंन्डहर्स्टरोड रेल्वे स्टेशन दरम्यानचे प्रत्येक स्टेशनचे मिळुन जवळ जवळ ८० ते ८० सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज यांची तपासणी केली. त्यावरून गुन्हयातील पाहिजे आरोपी इसम हे राहत असलेले डोंगरी मुंबई परिसरातील हाॅटेल मधुन त्यांचे नाव व पत्ते निष्पन्न करून नमुद गुन्हयातील ०३ आरोपी इसम यांना गुन्हा घडल्यापासुन ०७ दिवसात दिल्ली हया राज्यातुन अटक करून अदयापर्यंत अटक आरोपी इसम यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी किं रू ९,००,०००/- किंमतीचे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
अटक आरोपी इसमाचे नाव व पत्ता
१) अलीमुददीन अब्दुल हमीद वय ४७ वर्ष, धंदा नाही राह. ई १३,बी ४६९, जे ब्लाॅक, न्यु सीलमपुर, नवी दिल्ली.
२) साजीद खुबनसीब वय २७ वर्ष, धंदा नाही, राह. आदर्श स्कुलच्या जवळ, ५२ पीरवाली गल्ली, प्रेमनगर, लोनी देहात, गाझीयाबाद उत्तर प्रदेश.
३) मोहम्मद रमजानी मोहम्मद हनीफ वय ४४ वर्ष, धंदा नाही, राह. अे १०७, के ब्लाॅक, जुग्गी न्यु सिलमपुर, नवी दिल्ली, सध्याचा पत्ता जी/४१, गल्ली नं. १३, मुस्तफाबाद नवी दिल्ली.
अटक आरोपी नामे मोहम्मद रमजानी यांचा गुन्हे अभिलेख:-
१) दहिसर पोलीस ठाणेे, मुंबई केस नं. 15097/2016 रजिस्टेªेषन केस क्र. 3512/2016 दि. 23/11/2016 कलम 454, 380, 34 भादवि.
२) दहिसर पोलीस ठाणेे, मुंबई केस नं. 15096/2016 रजिस्टेªेषन केस क्र. 3511/2016 दि. 23/11/2016 कलम 454, 380, 34 भादवि.
३) कांदीवली पोलीस ठाणे, मुंबई केस नं. 702/2017 रजिस्ट्रेषन केस क्र. 180/2017 दि. 11/01/2017 कलम 454, 380 भादवि.
४) सिलमपुर पोलीस ठाणे गु.र. क्र. 78/2003 कलम 379, 411, 34 भादवि.
अटक आरोपी नामे मोहम्मद रमजानी यांचा गुन्हे अभिलेख:-
१) गोकुळपुरी पोलीस ठाणे, दिल्ली गु र क्र 65/2001 कलम 457, 380, 34 भादवि.
२) जहांगीरपुरी पोलीस ठाणे, दिल्ली गु.र. क्र. 167/1998 कलम 451, 392, 34 भादवि.
सदर गुन्हयातील अटक आरोपी इसम हे दिवसा टापटीप स्वच्छ कपडे घालुन प्रथम घराची रेखी करून बंद रूमचे लाॅक तोडुन घरफोडी करतात व दिल्ली येथे पळुन जातात. अशाच प्रकारचे गुन्हे कुठे दाखल असतील त्यांनी नमुद आरेापी इसमांचा ताबा घ्यावा.
सदरची उत्तम कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि 02, श्री शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग श्री भागवत सोनावणे, वपोनि श्री सुभाष कोकाटे, पोनि गुन्हे श्रीमती वैषाली गलांडे. यांचे मार्गदर्षनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. समीर चासकर, पोह. सुदर्षन सारंग, महेश कांबळे पोना. धिरेन पाटील पोना. अमित पाटील, पोशि. सचिन सरगर, पोशि. सचिन पवार यांनी केलेली आहे. अशी माहिती खांदेश्वर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली आहे.
w
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा