मुंबई : कांदिवली येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षाच्या तरुणावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आकाश दादू पवार हा जखमी झाला असून तो आरोपींचा शत्रूच्या मुलासोबत राहतो. त्यांच्याशी संबंध ठेवतो या कारणावरून त्याच्यावर हल्ला झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी समतानगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रसाद पोळा उर्फ परशा आणि जतीन जावळे उर्फ जेत्या अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

0 टिप्पण्या