Ticker

6/recent/ticker-posts

दृष्टीहीन व मतिमंद मुलांसाठी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करणार - सत्यवान नर

आधारिका फाउंडेशन व नन्ही परी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

दृष्टीहीन व मतिमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आधारिका फाउंडेशन व नन्ही परी फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक श्री सत्यवान नर व इतर पदाधिकाऱ्यांची  भेट घेतली. जीवन प्रबोधिनी ट्रस्ट कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य या क्षेत्रात करत असलेल्या  भरीव कामगिरीला प्रोत्साहित होऊन त्यांनी ही भेट घेतली. यावेळी श्री नर यांनी योग्य ट्रस्टच्या वाटचालीबद्दल माहिती दिली तसेच मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आधारिका फाउंडेशन व नन्ही परी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. दृष्टीहीन व मतिमंद मुलांसाठी शासनाच्या  विविध योजनांमधून जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल या दृष्टीने सर्व मिळून काम करू अशी ग्वाही दिली.



यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने  सचिव हेमंत मकवना, श्री अमित पवार, श्री गणेश क्षीरसागर, श्री रवींद्र जाधव श्री विजय काळे, प्रशांत पवार तसेच आधारिका व नन्ही परी ट्रस्ट चे श्री श्रीकांत राणे, श्री विनायक मोरे, श्री संतोष मळेकर, श्री उमेश घाडगे, रवींद्र शिंदे, श्री रामचंद्र पाल आदी उपस्थित होते. यावेळी श्री सत्यवान नर यांनी आधारिका व नन्ही परी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना सुप्रसिद्ध लेखक प्रशांत डिंगणकर लिखित "काय समजलीव" हे पुस्तक भेट देत उपस्थितांचे आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या