बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्च्युअली वाईल्ड' या आभासी सफरीच्या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे ह्यांच्या हस्ते आज (दिनांक २३ मे २०२२) करण्यात आले. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील ‘सेल्फी पॉईंट’चेही लोकार्पण करण्यात आले. मुंबई प्राणिसंग्रहालयात नवीन आणलेले नर अस्वल (शिवा) ह्याला देखील प्रदर्शनीमध्ये यावेळी सोडण्यात आले.
याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिनांक १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जसंवि/०९०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा