तीन गुन्ह्यांची उकल, पाच गाड्या हस्तगत
मुंबई : सुरक्षित ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींवर पाळत ठेऊन संधी मिळताच बनावट चावी वापरून त्या चोरून नेऊन त्यांची विक्री करणारी एक टोळी गुन्हे शाखा युनिट-११ च्या हाती लागली आहे. या आरोपींनी केलेल्या तीन गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी पाच गाड्या हस्तगत केल्या आहेत. यात दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
मालवणी परिसरात दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय असून ते मार्वे रोडवरील लोटस तलावासमोर चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भरत घोणे, एपीआय जाधव, विशाल पाटील व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी दोन बाईकवरून तीनजण तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले. त्या तिघांच्या ताब्यात असलेल्या दोन गाड्यांची त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या गाड्या चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला असता त्यांच्याकडून अजून तीन बाईक जप्त केल्या. या तिघांना पकडल्यामुळे मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींपैकी एक १७ तर एकजण १५ वर्षांचा आहे. हे तिघेजण पार्क केलेल्या गाड्यांवर पाळत ठेऊन नंतर बनावट चावीच्या आधारे त्या गाड्या चोरून नेऊन विकत असत अशी गुन्ह्याची त्यांची पद्धत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा