अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस बाळगणा-या व त्यास पुरविणा-या आरोपीतींना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, २४ मे, २०२२

demo-image

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस बाळगणा-या व त्यास पुरविणा-या आरोपीतींना अटक

एकुण ५,७८,७००/- रू किमतीचा मुद्देमालासह गुन्हे शाखा, मध्यवर्ती कक्ष नवी मुंबई यांनी केली अटक
 
नवी मुंबई परिसरात अवैरित्या शस्त्रे बाळगणा-या इसमांविरूध्द कारवाई करण्याबाबतची विशेष मोहिम राबविणेबाबत मा. पोलीस आयुकत श्री बिपीन कुमार सिंग, यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मा. सह पोलीस आयुकत डॉ. श्री. जय जाधव , मा. अपर पोलीस आयुक् (गुन्हे) श्री. महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे मा. पोलीस उप आयुक्त श्री. सुरेश मेंगडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विनायक वस्त यांनी नवी मुंबई परिसरातील अवैद्यरित्या शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
 
photo2

मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयसिंह भोसले यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या शस्त्रे बाळगणा-या इसमांविरूध्द कारवाई करणेकामी पोउपनिरी संजय रेडूडी पोलीस अंमलदार यांचे पथक नेमण्यात आलेले होते. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथील संजय रेड्डी, पोलीस उप निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरूळ रेल्वे स्टेशन बाहेर कौशल्यपुर्ण वेशांतर सापळा रचुन खालील नमुद इसमास अटक केली त्यांचेकडून खालील नमुद मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. . १७१/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम , २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन मध्यवर्ती कक्षाकडुन पुढील अधिक तपास चालु आहे.


नमुद आरोपीस अग्निशत्र पुरविणा-या आरोपीस कराड जि. सातारा येथे जावुन इसम नामे अल्तमेश उर्फ मोन्या हारूण तांबोळी, वय २२ वर्षे, रा.१२६,मंगळवार पेठ, कराड जि. सातारा यास सापळा रचुन मोठया शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केली आहे. तपासादरम्याण अटक आरोपी मोन्या उर्फ अल्तमश हारूण तांबोळी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर जि. सातारा येथे अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी, इतर असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री बिपीन कुमार सिंग, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. जय जाधव , मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे मा. पोलीस उप आयुक्त श्री सुरेश मेंगडे मा. सहाय्यक पोलीस आयुकत श्री विनायक वस्त यांचे मार्गदर्शनाखाली - कक्ष, गुन्हे शाखेचे वपोनि विजयसिंह भोसले, पोउपनि. संजय रेड्डी, पोलीस अंमलदार - मंगेश वाट, नितीन जगताप, किरण राउत, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम यांनी केलेली आहे.



press note

%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE_page-0001

%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE_page-0002


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *