Ticker

6/recent/ticker-posts

साऊंड बॉक्समध्ये लपवला लाखोंचा एमडी

दोघांना अटक, एमडी जप्त

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई अंमलीपदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ७६ लाख २० हजार किमतीचा एमडी साठा जप्त केला आहे.  दिनांक २६/०४/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटचे पोलीस उप निरीक्षक अमित देवकर यांना त्यांच्या गुप्त बामतीदारांकडुन माहिती मिळाली की, आरोपी आबीद शेख, रा. प्रिन्सेस बिल्डींग, रूम नं. ४२, इब्राहिम रेहमतुल्ला मार्ग, जे. जे. हॉस्पिटल जवळ, मुंबई या पत्त्यावरील त्याच्या घरातुन एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थाची विक्री करत आहे.



त्यावरून आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात ६० ग्रॅम वजनाचा एम.डी हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये असणाऱ्या एका साउंड बॉक्सच्या आतमध्ये लपवून ठेवलेला एकुण ४३० ग्रॅम वजनाचा एम.डी हा अंमली पदार्थ असा एकुण ४९० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ पंचनाम्यांतर्गत जप्त करण्यात आला आहे.


आरोपी आबिद शेख याचेकडे केलेल्या तपासात निष्पन्न झाल्यावरून त्याचा साथीदार रोहीत सोनी याला कोळीवाडा, मुंबई परीसरात १८ ग्रॅम एम.डी. या अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपींचे विरूध्द अं.प.वि.क गु र नं. ८५/२०२२ कलम ८ (क) सह २२ (क) २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना सदर गुन्हयात आज दिनांक २७/०४/२०२२ रोजी ०२.४० वाजता अटक करण्यात आली आहे.


अटक आरोपींची नावे : -

१) आबिद मोहमद अशरफ शेख वय २८ वर्षे, धंदा नाही, रा. जे जे हॉस्पिटल जवळ, मुंबई.

२) रोहित सुरेश सोनी वय २१ वर्षे, धंदा नाही, रा. कोळीवाडा, शिवडी मुंबई.


अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिट यांचेकडुन अटक आरोपींच्या साथीदारांचा शोध मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.


सदर कारवाई मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) ,श्री.डॉ.सुहास वारके सो, मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री विरेश प्रभु सो, मा. पोलीस उप आयुक्त,श्री.दत्ता नलावडे सो व मा. सहा. पोलीसकआयुकत,श्री. सावळाराम आगवणे सो अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र दहिफळे यांचे नेतृत्वाखाली पो.उ.नि. अमित देवकर, पोउनि मानसिंग काळे, पो.उ.नि. अशोक तपासे, पो.ह.क्र. ३३३४९/चाळके, पो.ना.क.९७०७२६/पाटील, पो.ना.क्र.०१२३०/चव्हाण पो.शि.क. ०८०७१२/भुजबळ, ०९२६१९/भोसले, पो.ना.चा.क. 0७१६१०/राठोाड, पो.शि.चा.क्र.०७०२०७/निंबाळकर यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मानसिंग काळे हे करीत आहेत.



















Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या