Ticker

6/recent/ticker-posts

मिठी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आढावा

 

मुंबई :  मिठी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

      

मिठी नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीत कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती करणे, नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक तेथे सुरक्षा भिंत बांधणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

     

यावेळी आमदार सर्वश्री दिलीप लांडे, सदा सरवणकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु, पर्यावरणवादी अफरोज शाह यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
































1231

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या