पोलीस आयुक्तांची पोलीस ठाण्यास भेट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ३ मार्च, २०२२

पोलीस आयुक्तांची पोलीस ठाण्यास भेट

रोज कमीतकमी एका सामान्य नागरिकाला मदत करा-आयुक्त


मुंबई, दादासाहेब येंधे : नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच कामाचा आढावा घेत ते ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. 


बुधवारपासून त्यांनी पोलीस ठाण्यात सरप्राईज भेट सुरू केली आहे. सुरुवातीला सकाळी अकराच्या सुमारास वाकोला पोलिस ठाणे गाठून त्यांनी कामाचा आढावा घेतला. थेट आयुक्त पोलीस ठाण्यात आल्यामुळे काहीवेळ पोलिसांची तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. पांडे यांनी वाकोला पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 


तसेच कामाचा आढावा घेत पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वच्छता तसेच कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने पोलीस ठाण्याची सजावट व पोलिस ठाण्याच्या इमारतीची चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करणे, प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे स्वरूपानुसार निवारण करणे, सिव्हिल मॅटर चुकीच्या पद्धतीने हाताळायचे नाही याबाबत सूचना दिल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज