‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १५ मार्च, २०२२

demo-image

‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये

अनधिकृत वृक्षतोड करणा-यांना दंड तसेच कैदेची शिक्षा

पर्यावरण जपणे व जोपासणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य 

पर्यावरण जपणे व जोपासणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. या अनुसार आपणा सर्वांना प्राणवायू देणा-या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे देखील आपणा सर्वांना आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तरतुदींमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा कलम २१ अन्वये अपराध आहे. यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या  प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच यासाठी एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. 


याबाबत उद्यान अधीक्षक श्री. परदेशी यांनी पर्यावरण जोपासण्याचे आवाहन करताना सांगितले आहे की, येत्या १७ मार्च २०२२ रोजीच्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. कोणत्याही प्रकारची अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘होळी’ च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका अधिका-यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास त्वरित कळवावे. जेणेकरुन, सदर बाबत तात्काळ कारवाई करणे शक्य होईल, असेही आवाहन श्री. परदेशी यांनी यानिमित्ताने केले आहे.











(जसंवि/ ६२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *