मुंबई : मुंबईत १२ केंद्रांवर सुरू झालेल्या लसीकरणाच्या सुरुवातीला बुधवारी काहीसा गोंधळ उडाल्याचे स्थिती होती. शहर उपनगरातील लसीकरण केंद्रावर सकाळपासून पालकांसह लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र, काही लसीकरण केंद्रांवर या विद्यार्थ्यांना ताटकळतच रहावे लागले. काही लसीकरण केंद्रांवर नियोजित वेळेत लसीकरण सुरू झाल्याची स्थिती होती. परंतु लसीकरण प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबत पालकांनी काहीसा नाराजीचा सूर आळविला. आधीच उशीर त्यात प्रक्रिया दिरंगाईने त्यामुळे काही लाभार्थी निघूनही गेले.
बारा केंद्रांपैकी काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले राजावाडी सारख्या रुग्णालयात लसीकरण उशिरा सुरू झाले. काही १२ वर्षांखालील मुलांनी लसीकरण करून घेतले.

0 टिप्पण्या