श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स
मुंबई, दादासाहेब येंधे : अल्लू अर्जुन ने साकारलेल्या पुष्पाचं वेड अवघ्या देशाला लागले आहे. चित्रपट रिलीज होऊन २ महिने उलटले पण पुष्पाराजची क्रेझ अजूनही कमी झालेली दिसत नाही.
सेलेब्रिटींपासून आपल्या नेतेमंडळींपर्यंत सगळ्यांनाच या चित्रपटाचे वेड लागले आहे. खासकरून 'श्रीवल्ली' हे गाणं आणि 'मै झुकेगा नहीं साला' हा डायलॉग भरपूर व्हायरल होत आहे. यावर लाखो मिम्सदेखील बनले आहेत. मुंबई पोलीसही पुष्पा फीवर पासून वाचू शकलेले नाहीत. मुंबई पोलिसांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
व्हिडिओ पहा...👇
मुंबई पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पोलीस बॅन्ड पथक (खाकी स्टुडीओ) यांनी पुष्पा: द राईज सिनेमातलं श्रीवल्ली हे गाणं बॅन्डवर वाजवलं. यात ड्रम, सेक्सोफोन, ट्रमपेट, बासरी अशा अनेक वाद्यांचा समावेश करत श्रीवल्ली गाण्याचं बॅन्ड वर्जन तयार करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. यावेळेला त्यांनी मुंबई पोलिसांची सुरेल सफर कभी 'रूकेगा नहीं' असं कॅप्शन दिलंय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा