शब-ए-बरातवेळी भोंग्याचा आवाज कमी ठेवा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १६ मार्च, २०२२

demo-image

शब-ए-बरातवेळी भोंग्याचा आवाज कमी ठेवा

मुंबई : शब-ए-बरात व धुलीवंदन एकाच दिवशी आले आहे. यानिमित्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील ३४ मौलवींची भेट घेतली आहे. यावेळी पांडे यांनी शब-ए-बरात वेळी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी भोंगे, लाऊड स्पीकरचा आवाज कमी करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.

.com/img/a/


ध्वनिप्रदूषणामुळे रुग्ण, जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ध्वनीप्रदुषणावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घातली. त्यानंतर पांडे यांनी आगामी शब-ए-बरात निमित्त गुरुवारी शहरातील ३४ मौलवींची  भेट घेतली. सध्या शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे भोंगे, लाऊड स्पीकरचा आवाज कमी ठेवावा. उत्सववावेळी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पांडे यांनी मौलवींना केले. मौलवींच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मुक्ती मोहम्मद उस्मान अशरफी यांनी पोलिस आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही पोलिसांना सहकार्य करू असे सांगितले.










.com/img/a/












प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *