मुंबई : महासंचालकपदाच्या प्रभारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची राज्य सरकारने सोमवारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली.
राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी संध्याकाळी आदेश जारी करीत, मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडील महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा