Ticker

6/recent/ticker-posts

वॉटर टॅक्सी आजपासून सेवेत

 मुंबई : देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत ज्या सुविधांची सुरुवात होते, त्या सुविधांचा प्रसार पुढे देशभर होतो. त्याचे अनुकरण देशभर केले जाते, असे मुख्यमंत्री काल गुरुवारी म्हणाले.


देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे आणि बेलापूर जेट्टी चे उद्घाटन गुरुवारी झाले. यावेळी ते बोलत होते. वॉटर टॅक्सीची सुविधा आज शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत आहे.


मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ ३० मिनिटांत पार करता यावे आणि रस्ते, तसेच रेल्वेवरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या