Ticker

6/recent/ticker-posts

चोरीस गेलेल्या बॅगेचा यशस्वीरीत्या तपास

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी


मुंबई, दादासाहेब येंधे : सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे गु. रजि. नं. १३१/२०२२ कलम ३७९ भादंवि मधील तक्रारदार श्रीमती नागम्मा शिवलींगी अप्पा आन्नपल्ली (वय ४८ वर्षे) या दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ५ वाजेदरम्यान कृष्णा रेल्वे स्टेशन, राज्य - तेलंगणा, येथून दादर, मुंबई येथे येण्यासाठी गाडी क्र. २२१५८ अप चेन्नई एक्सप्रेस गाडीचे कोच नं. एस/४, सिट नं. ६५, ६६, ६७, ६८ वरून त्या स्वतः व  त्यांची बहीण अनिता, शारदा व  दीर लक्ष्मण यांचेसह प्रवास करीत होत्या. 


प्रवासादरम्यान त्यांनी त्यांचे सामान सीटच्या खाली ठेवले होते. दिनांक १८ फेब्रुवारी २०२२२ रोजी ५.३० वा. गाडी दादर रेल्वे स्टेशन फलाट क्र. ०६ वर पोहचल्यावर त्यांनी गाडीतून खाली उतरून फलाटावर उभे राहून बॅगा मोजत असताना त्यांची ग्रे रंगाची बॅग ही गाडीत सिटखाली विसरली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच सदरची बाब त्यांचे दिर लक्ष्मण यास सांगितली. त्यानंतर त्यांनी लगेचच पाठीमागील लोकल गाडी पकडून सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे येवून फलाट क्र. ०९ वर उभ्या असलेल्या अप चेन्नई एक्सप्रेस गाडीचे कोच नं. एस/४ मध्ये जावून त्यांच्या बॅगेचा शोध घेतला, परंतू ती डब्यात मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरटयाने सिटखाली विसरलेली बॅग त्यातील ३२६ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह उचलून चोरी केली आहे अशी त्यांची खात्री पटली. त्याबाबत त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेत वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.



सदर गुन्हा नोंद होताच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार तसेच सीएसएमटी मेनलाईन रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले पो.हवा./१८१५, ईश्वर सुखदेव जाधव यांनी अप चेन्नई एक्सप्रेसची माहिती घेता सदर ट्रेन माझगांव यार्ड येथे वॉशिंग करिता गेलेली असल्याची माहिती प्राप्त झाली.


त्यानुसार जाधव यांनी लागलीच कार्यतत्परता दाखवून माझगांव यार्ड येथे गेले.तेथे अप चेन्नई एक्सप्रेस उभी होती परंतू तिचे दारे खिडक्या बंद होत्या. तेव्हा त्यांनी युक्तीने गाडीचे आपत्कालीन खिडकीतून आत प्रवेश करुन 'एस/४' डब्यामध्ये जाऊन सदर तक्रारदार यांच्या बॅगेचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सदरची बॅग सिटखाली एका कोपऱ्यात पडलेली त्यांना मिळून आली. ती त्यांनी ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आणली असता ठाणे अंमलदार यांनी सदर तक्रारदार यांना बोलावून ती बॅग दाखविली. ती बॅग त्यांनी पाहून त्यांचीच असल्याचे सांगितले.


नंतर बॅगेतील दागिने तपासले असता त्यामध्ये गळयातील ५ सोन्याचे हार, ३ मंगळसुत्र, १ सोन्याची चेन, ७ सोन्याचे बाळे, १ सोन्याचे ब्रेसलेट, ५ सोन्याच्या अंगठया, ६ जोड सोन्याची कर्णफुले असे एकुण ३२६ ग्रॅम वजनाचे व १६,८५,०९४/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जसेच्या तसे मिळून आलेले आहेत.


सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मेहबूब इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. मनोजकुमार माने, सपोफौ. महेश दळवी, पोहवा/१८१५ ईश्वर सुखदेव जाधव यांनी सदर गुन्हयाचा तपास कार्यतत्परतेने करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चांगली कामगिरी केलेली आहे.


 














Press Note


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या