मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागकडे जाणाऱ्या अजंता बोटीमधून मंगळवारी एक प्रवासी समुद्रात पडला. त्याला पोहता येत असल्याने तो बचावला. 'अजंता लॉन्च' बाबत वेळोवेळी तक्रारी येत असून त्याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वी अजंता बोट मांडवा समुद्रात बुडाली होती. पोलिसांनी तातडीने मदत केल्याने प्रवासी बचावले होते.
व्हिडीओ पहा....👇
प्रशांत कांबळे हा प्रवाशी अजंता बोटीने मंगळवारी सकाळी नऊ वाजता गेटवे येथून मंडवाकडे निघाला होता. तो बोटीच्या एका बाजूला उभा होता. तो टेकून असलेल्या ठिकाणाचे लाकूड तुटल्याने तो सामनासह पाण्यात पडला. पण, त्याला सुदैवाने पोहता येत असल्याने तो बचावला. बोटीतील खलाशांनी त्याला दोर टाकून बोटीत घेतले. सखोल चौकशीची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
0 टिप्पण्या