मुंबई : लोकप्रिय 'महाभारत' या टीव्ही मालिकेत भिमाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रवीण कुमार सोबती (७४) यांचे निधन झाले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. काही दिवसांपूर्वी ते आजाराशी झुंज देत होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऍथलिटही होते. दोन ऑलम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदके पटकावली होती. त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Photo: viral
0 टिप्पण्या