मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात काल आग लागली होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चर्चगेट सबवे गेट क्र. ३ येथे दुपारी १.४५ च्या सुमारास आग लागली होती. आगीमुळे धुराचे लोट पसरल्यामुळे रेल्वे कर्मचारी - प्रवाशांनी स्टेशनबाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर अवघ्या ३० मिनिटात नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हि आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून अधिक तपस सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा