मुंबई : बिगबॉस मराठी-३ च्या ग्रँड फिनालेत विशाल निकम विजेता ठरला आहे. त्याला २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. विशाल निकमसह विकास पाटील, जय दुधाने, मीनल शाह आणि उत्कर्ष शिंदे हे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले होते. त्यातून विशाल आणि जय दुधाने या दोघांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी बिगबॉस-३ च्या व्यासपीठावर येण्यास सांगितले. त्यातून विशाल निकम यास मांजरेकर यांनी विजेता घोषित केले.
१९ सप्टेंबर रोजी बिगबॉस-३ हा शो सुरु झाला होता. त्यात १७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. विशाल निकम मूळचा सांगलीच्या देवखिंडी येथील आहे. त्याने मिथून या चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर धुमस या मराठी चित्रपटातही काम केले. त्याला लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमुळे.
Photo : viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा